धनतेरसच्या मुहूर्तावर लोकां मध्ये खरीदीचा उत्साह
दिवाळी आली कि बाजारात खरेदी चा उत्साह असतोच पण गेल्या वर्षी झालेल्या नोट बंदी मुळे म्हणा किंवा ह्या वर्षी लागू झालेल्या जी एस टी मुळे बाजारात मंदी चे वातावरण निर्माण झाले होते पण आता ह्या सणा मुळे लोकां मध्ये खरीदी करता उत्साह बघण्यात येत आहे..धनतेरस ला लोक सोने चांदी च्या खरेदी ला प्राधान्य देतात पण ह्या वर्षी होम अप्प्लायन्सेस ला जास्त प्राधान्य देत आहेत..दुपारी तीन ते ४.४० पर्यंत आणि नंतर ७.४४ ते रात ९.४४ पर्यंत सोने चांदी आणि प्रॉपर्टी च्या खरेदी चा चांगला मुहूर्त आहे आणि ११ ते २ हा मुहूर्त कुठल्याही वस्तू च्या खरेदी करता योग्य आहे असे सांगण्यात येत आहे..काही लोक खरेदी करता दिवाळी ची वाट पाहतात त्या मुळे बाजारात अत्यंत उत्साही वातावरणाचे निर्माण झाले आहे